- भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- अल्पवयीन मुलीला प्रपोज करून तिच्याशी गोड बोलून तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेतला. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या घरात कोणीही नसताना जून २०२१ मध्ये गैरफायदा घेतला.
आरोपीने फिर्यादीच्या मुलीसोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीची मुलगी गर्भवती राहिली, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
पीडित मुलीच्या ४४ वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोट्या मांडवकर (वय अंदाजे २०, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.