- तिघेजण अटकेत तर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२१) :- थेरगावमधील पडवळनगरमध्ये श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजिला होता. कार्यक्रमात फिर्यादी यांचा भाचा व भाजी यांच्याशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या इतर साथीदारांना बोलवले. आरोपींनी कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.
आरोपीने फिर्यादी यांना कोयता मारला, मात्र तो चुकवून फिर्यादी घरात पळून गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजा, खिडक्यांवर लाथा मारल्या. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. २०) मध्यरात्री एक वाजता अक्षयचंदन सोसायटी समोर घडला.
प्रकाश मल्लाप्पा देवणगाव (वय २६, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर वदक, करण सोनवणे, समीर इनामदार, शुभम म्हस्के, आसिफ मुजावर, करण जैसवार, राहुल माकर, आकाश शिंदे, अखिलेश माकर आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सागर वदक, करण सोनवणे आणि राहुल माकर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.