- पोटमाळ्याला लागली होती आग; निगडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२१) :- निगडीतील युमुनानगर येथील एलआयसी बिल्डिंग गाळा नं. ४ मध्ये आरोपीने स्वतःच्या गाळ्यात अनधिकृतपणे पोटमाळा तयार केला व तो २५ वर्षीय तरुणाला राहण्यासाठी दिला. (दि. २१ डिसेंबर २०२०) रोजी सकाळी सातच्या सुमारास या गाळ्याला अचानक आग लागली.
या आगीत हा तरुण ९८ टक्के भाजला व त्यातचा त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अंकित अनिल अगरवाल (वय २५) असे आगीत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी विनोद बगेश्वर पाठक ( वय ४५, रा. यमुनानगर, निगडी) आणि अजित बाळकृष्ण कुलकर्णी (वय ४२) या दोघांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तब्बल दहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.