- कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन; बनावट मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२१) :- आरोपीने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचे अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग असल्याचा बनाव रचून कंपनीच्या नावाचा बनावट लोगो तयार केला. रेड लेबल चहा पावडर माल आणि इतर आठ प्रकारची उत्पादने ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुकानात विक्रीसाठी ठेवली.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कंपनीकडून सचिन रमेश गोसावी (वय ४०, रा. खार, मुंबई) यांनी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रतापराम ताजाराम चौधरी (वय २८, रा. रामनगर, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले आहे. आरोपीकडे ७० हजार ४४२ रुपयांचा बनावट मुद्देमाल आढळून आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.