- पालिकेकडून बाईकसाठी तब्बल ४८ लाखांचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी महापालिका ५० स्मार्ट दुचाकी वाहने खरेदी करून देणार आहे. त्यासाठी ४८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
छोट्या – मोठ्या गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी पोलिस पेट्रोलिंगची आवश्यकता आहे. त्यासाठी दुचाकी हे सुलभ व वेगवान वाहन आहे. तातडीने कमी वेळेत आदी ठिकाणी पोहचण्यास मदत होते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी महापालिकेकडे पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी पल्सर १५० डीटीएस या मॉडेलच्या ५० दुचाकी वाहनांची मागणी १ ऑगस्टला केली आहे.
वाहनांसोबत २ माईक सायरन, प्लॅस लाईट, कॅमेरा, जीपीएस ट्रॅकींग सिस्टीम, जॅमर होल्डर, हेल्मेट आदी असणार आहेत. दुचाकीचा दर ९४ हजार ८५० आहे. ५० दुचाकीसाठी एकूण ४७ लाख ४२ हजार ४०० रूपये खर्च अपेक्षित आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून २ कोटी ३४ लाख रूपये पोलिसांनी जमा केले आहेत. त्या निधीतून हा खर्च केला जाणार आहे.