- मुलीच्या आईची पोलिसात तक्रार; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- पीडित पाच वर्षीय मुलीला आरोपीने त्याच्या दुचाकीवरून घराजवळ असलेल्या पेरूच्या बागेतील गोठ्यात नेले. तिथे जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वापाच ते सहा वाजताच्या दरम्यान दिघी येथे घडली. शशिकांत आबासाहेब तापकीर (वय ६७) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि. २४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.