- सांगवीतील घटना; आईकडून पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑक्टोबर २०२१) :- आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला खोट्या तक्रारीत अडकवण्याची व मुलाचे तोंड पाहून देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच, तुझ्या नातेवाईकांशी कुठलाही संबंध ठेवू नये, यासाठी दबाव टाकला. तू मर, असे म्हणून आरोपी पत्नीने त्रास दिला. शिवीगाळ करून दमदाटी केली. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
प्रसाद उमेशराव देशमुख (वय ३४), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत प्रसाद यांच्या आईने सोमवारी (दि. २५) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, प्रसाद यांची पत्नी, सासू, विशाल, राजेंद्र (सर्व रा. सुभाष नगर, येरवडा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुनी सांगवीतील ढोरे नगर गल्ली येथे २ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. पोलीस उपनिरीक्षक के. एस. गवारी तपास करीत आहेत.