- राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ८२१५ विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर हा विषय येणार आहे. सत्तर कोटींच्या टॅब खरेदीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला आहे.
माजी महापौर योगेश बहल यांनी पत्र दिले आहे. महापालिकेने ४० हजार टॅब खरेदी करण्याचा घाट घातला आहे. या खरेदीसाठी तब्बल ७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनासारखी गंभीर स्थिती असताना तसेच शाळा बंद असताना विद्यार्थ्यासाठी टॅबची खरेदी केलेली नाही. आता शाळा सुरू झालेल्या असताना टॅब खरेदीचा घाट घातला जात आहे. ही टॅब खरेदी म्हणजे सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदाराने संगनमताने निवडणुकीचा फंड गोळा करण्याच्या स्वार्थी हेतूने डाव रचलेला आहे, अशी टीका योगेश बहल यांनी केली
महापालिकेच्या शाळेत सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना टॅब चालविण्याचे प्रशिक्षण नाही. विद्यार्थीही टॅबच्या वापराबाबत अनभिज्ञ आहेत. गेल्या पावणे दोन वर्षात पदाधिकाऱ्यांनी मंडळातील शिक्षण सदस्यांना तरी प्रशिक्षण देणे गरजेचे होते, असे त्यांनी म्हटले आहे.