- अधिकाऱ्यांच्या बदलीला पालिका निवडणुकांची किनार?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस दलातील १६ पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षातून विविध शाखा आणि पोलीस ठाण्यांशी बंदोबस्त आणि कामकाजाच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव संलग्न करण्यात आले आहे. तर, १७ निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. शिवाय ३१ पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
१६ पोलीस निरीक्षकांची नावे आणि बदलीचे ठिकाणं :-
किशोर ढोमन पाटील – नियंत्रण कक्ष ते चिंचवड पोलीस ठाणे (गुन्हे), रुपाली प्रल्हाद बोबडे – नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे, रावसाहेब बापूराव जाधव – नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), दीपक रामचंद्र साळुंखे – नियंत्रण कक्ष ते भोसरी वाहतूक आणि वाहतूक व नियोजन विभाग, रणजित नारायण सावंत – नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे, रामचंद्र नारायण घाडगे – नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा १, मधुकर माणिकराव सावंत – नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), सुनील जनार्दन टोणपे – वाकड पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), विश्वजित खुळे – चिंचवड पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे (गुन्हे), राजेंद्र जयंतराव निकाळजे – नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (गुन्हे), वैभव काशीनाथ शिंगारे – तळवडे वाहतूक ते चाकण पोलीस ठाणे, श्रीराम बळीराम पौळ – खंडणी विरोधी पथक ते रावेत पोलीस चौकी, वसंतराव दादासाहेब बाबर – आर्थिक गुन्हे शाखा ते चिखली पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक), सतीश दत्तात्रय माने – चिखली पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, शहाजी नारायण पवार – तळेगाव दाभाडे ते नियंत्रण कक्ष, अजय विनायक जोगदंड – हिंजवडी पोलीस ठाणे ते खंडणी विरोधी पथक.