- नवीन अकरा सदस्यांची भर पडणार; लोकसंख्येच्या निकषावरून बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- लोकसंख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील सदस्यसंख्या प्रभावित होणार आहे.
सध्याची १२८ नगरसेवकांची संख्या १३९ वर पोहोचणार आहे. नवीन अकरा सदस्यांची त्यात भर पडणार आहे. ही निवडणूक २०११ च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे.
शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यापैकी १३ लाख ५० हजार मतदार आहेत. यापूर्वी नगरसेवकांची संख्या १२८ होती. १२ ते २४ लाखांच्या लोकसंख्येसाठी १३९ नगरसेवक हे सूत्र ठरविण्यात आले आहे.