- आयकर विभागाने धाडली नोटीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- आयकर विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाने पाठवलेली नोटीस हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पवारांच्या मालमत्तावर कारवाई करण्या संदर्भातील नोटीस अजित पवार यांना पाठवण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. कालच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.
अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे ते म्हणाले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.