- जवळपास पाऊणकोटींचे साहित्य जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) :- लोणावळा परिसरातील कार्लागावच्या हद्दीत एम.टी.डी.सी जवळ दुर्गा सोसायटीमधील तन्वी बांगल्यात काही लोक स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लिल हावभाव करुन डान्स करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी दोन पथके तयार करुन दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यावर छापा मारला. त्यावेळी ९ पुरुष आणि ८ महिला गाण्यावर अशीलपणे डान्स करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नऊ पुरुष आणि आठ महिला अशा १७ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्नील जगदीश तापकीर,
विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब विर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व. रा. चऱ्होली) यांच्यासह ८ महिलांवर कारवाई केली आहे. रोख रक्कम, मोबाईल फोन, ५ चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा पोलिसांनी केली.