न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती, सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्ती आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
त्यामुळे गुरुवार (दि. १८) रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार होती. पालिकेकडून होणारा सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार होता. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठाही बंद होणार होता. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. १९) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठाही अनियमित होण्याची शक्यता होती.
मात्र, पालिकेने नव्याने प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात काही तांत्रिक अडचणीमुळे गुरुवारी (दि. १८) ऐवजी गुरुवारी (दि. २५) रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन असल्याचे म्हटले आहे.