- दिवाळी आणि कोरोना लसीकरणाचा परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत दिवसाला ४० ते ५० रक्ताच्या पिशव्यांची मागणी आहे. तर दिवसाला १० ते १५ दाते रक्तदान करण्यासाठी येत असल्याची स्थिती आहे.
सद्यस्थितीत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय सर्वच आजारांच्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे. तसेच शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतळेल्या रक्तदात्यांना १४ दिवस रक्तदान करता येत नाही, त्यामुळे दात्यांची संख्या कमी झाली आहे.
दिवाळीच्या काळात रक्तदान शिबिर झाले नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्यस्थितीत वायसीएम रक्तपेढीत दिवसाला ४० ते ५० रक्ताच्या पिशव्यांची मागणी आहे. तर १० ते १५ प्लेटलेट्सच्या बॅगची मागणी आहे.
– डॉ. शंकर मोसळगी, वायसीएम रक्तपेढी…