- पाच जणांच्या विरोधात चिखली पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- व्हाट्स अपद्वारे +48732232181 या क्रमांकावरून आरोपी महिलेने फिर्यादीसोबत ओळख वाढवली. भारतात फिरण्यासाठी येत असल्याचा बनाव रचून महिलेने फिर्यादीस +918586964182 या क्रमांकावरून फोन करून ‘मी कस्टम ऑफिसर दिल्ली येथून बोलत आहे. साथीदार महिला दिल्ली विमानतळावर आल्या असून त्यांच्याकडे दोन लाख पौंड कॅश मिळाली आहे. ही कॅश बाळगणे अनधिकृत असल्याने त्यासाठी एक लाख ३८ हजार ७५० रुपये दंड भरावा लागेल’ असे फिर्यादीस सांगितले.
फिर्यादी यांनी तो दंड भरला. त्यांनतर आरोपीच्या आणखी दोन महिला साथीदार यांच्या पासपोर्ट व ओळखपत्रातील नावामध्ये बदल असल्याचे सांगून त्यासाठी सात लाख २४ हजार ५३० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. आणखी इतर कामासाठी पाच लाख ६८ हजार ९९९ रुपये भरले.
फिर्यादी यांनी आरोपी अमित कुमार, अनिल शर्मा, अनिल शर्मा नावाचा दुसरा व्यक्ती अशा तीन बँक खात्यांवर एकूण १४ लाख ३२ हजार २७९ रुपये भरले. आरोपींनी फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. संगमेष मडीवालप्पा वटगे (वय ३२, रा. जाधववाडी, चिखली) यांनी सोमवारी (दि. १५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अखिला प्रदीप, अंकिता शर्मा, अमित कुमार (रा. जाकीरनगर, दिल्ली), आणि शर्मा (बस्तीहजरात निजामुद्दीन वेस्ट, नवी दिल्ली), अनिल शर्मा (रा. नवी दिली), +48732232181, +918586964182 या मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.