- महाड तालुक्यातील आदर्शवाडीत गावकऱ्यांना पोशाख अनं अन्नधान्याचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- बालदिनानिमित्त पुण्यातील आधार फाउंडेशन या बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने रायगड येथील महाड तालुक्यातील आदर्शवाडी, कुभार्डे गावच्या सार्वजनिक सभागृहात दिडशे महिलांना साड्या, शंभर पुरुषांना पोशाख आणि शंभर लहान मोठ्या मुला-मुलींना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच ऐंशी कुटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गावच्या सरपंच ताईबाई कोळी, पोलिस पाटील बाळू पवार, तंटामुक्ति अध्यक्ष लिलाधर दरेकर, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अशोक मुकणे, सदस्य दिपक मुकणे, सुनिता पवार आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. “आधार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने वयोवृध्द जेष्ठ नागरीकांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन संस्थेचे प्रमोद मोरे, संदिप शेटे व आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नितेश पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सहसचिव तुषार आहिरे, मुख्य समन्वयक प्रमोद मोरे, रोहित आहिरे, संदिप शेटे, विकास डिंबळे, समिर पवार, सुनिल आहिरे यांनी कष्ट घेतले.