न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची १ सप्टेंबरला रायगडमध्ये बदली झाली आहे. त्यांच्या जागी शिक्षण आयुक्तालयातील सहाय्यक स्मिता गौड यांच्याकडे ८ ऑक्टोबरला महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राज्य परीक्षा परिषद यांनी गौड यांना महापालिका शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी पदावर रूजू करून घेण्याबाबत १३ ऑक्टोबरला अहवाल सादर केला होता. त्यानुसार गौड यांना रूजू करून घेतले आहे. त्याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे.