- तीन केंद्र चालकांच्या नेमणुका रद्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात खासगी तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आलेल्या २२ नागरी सुविधा केंद्रांसाठी महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर, निगडी – प्राधिकरण, दापोडी आणि चिंचवड येथील ३ केंद्र बंद करण्यात येणार आहेत. या तीन केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्राच्या नेमणुका रद्द केल्या आहेत.
महापालिकेच्या तसेच इतर शासकीय, निमशासकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात एकूण २५ ठिकाणी खासगी तत्वावर नागरी केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत. २५ जुलै २०१८ रोजी हे केंद्र सुरू करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला होता.
२८ ऑगस्ट २०१८ रोजी एकूण २५ नागरी सुविधा केंद्र चालकांना ३ वर्ष कालावधीसाठी करारनामा करुन नियुक्ती आदेश बजावला होता. त्याची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली. यातील ३ केंद्र चालकांच्या नागरी सुविधा केंद्रासाठी नेमणुका रद्द केल्या आहेत. तर, २२ केंद्रांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाणार आहे.