- मावळातील घटना; रुग्णांवर उपचार सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) :- मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरातील भडवली गावात अन्नातून नागरिकांना विष बाधा झाली आहे. त्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे, चक्कर येणे, मळमळ होणे अशा प्रकारची लक्षणे दिसुन आली आहेत. साधारणतः रुग्णालयात २८ ते ३० रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यामध्ये ५ ते ६ पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना औंध हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णालयातील सर्व बेड फुल झाले आहेत. त्यामुळे काही रुग्णांना ग्रामीण रुग्णलाय कान्हे फाटा येथे पाठवण्यात आले आहे, असे डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान भडवली गावात गुरुवार (दि.१८) रोजी काकडा आरती समाप्तीचा काल्याचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. त्यात ग्रामस्थांसाठी जेवनाची सोय करण्यात आली होती. त्यातून ३५ ते ४५ नागरीकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ६ ते ७ लहान मुलांचा समावेश आहे.