- मास्कमध्ये मोबाईलसारख डिव्हाईस; पोलिसांना पाहताच ठोकली धूम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायाच्या ७२० जागांच्या भरतीसाठी ८० सेंटरवर आज लेखी परीक्षा झाली. पोलीस आयुक्तालयातील ७२० जागांसाठी ऐकून १ लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान परीक्षेला एक परीक्षार्थी चक्क मास्कमधून मोबाईलसारख डिव्हाईस घालून आला होता. मास्कच्या आत बॅटरी, कॅमेरा आणि सिम कार्ड होत. तो पोलिसांना फसवून आत जाण्याच्या अगोदर त्याला पकडण्यात आले. ही घटना हिंजवडी येथील ब्लू रिच या सेंटरवर समोर आली.
त्यामधून इतर दुसऱ्या व्यक्तीला संवाद साधता येतो की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्याचे इतर साथीदार देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तो परीक्षार्थी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला असून तो पळून गेला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.