न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२१) :- तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर दुचाकी आणि पीएमपीएमएलच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. खालुंब्रे गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री सात वाजात हा अपघात घडला. या बाबत पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यवान कुंडलिक बेंद्रे (वय ३०, रा. सुनिलनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे. शिवजीत अजयकुमार मंडल (वय २१, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) आणि एक अनोळखी व्यकती अंदाजे वय २५ वर्षे याचा मृत्यू झाला आहे.