न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकूलचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या सूचनेनूसार पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत रविवारी स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
त्यात प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे १०५ विद्यार्थी, प्राध्यापकांनी चिंचवड, आकुर्डी परिसरातील एस. टी. पी. प्लॉट ते बॉम्बे सिलेक्शन, रेल्वे लाईन परिसरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास, पिशव्या, कचरा एकत्रित करून या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
सकाळी ७ ते १० यावेळेत परिसरातील स्वच्छता मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. अरविंद बोरगे, प्रा. आश्लेषा देवळे, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. प्रमोद इंगळे, विद्यार्थी, प्रतिनिधी हरीष पाटील, पुजा काळे, रोहन शिंदे, ओमकार मांडगे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेनंतर प्रा. अरविंद बोरगे यांनी महाविद्यालयाचे सचिव डॉ. दिपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनाचे अधिकारी समवेत सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले.