- एमआयडीसी भोसरी पोलीसांकडून दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- पायी चालत जात असताना त्यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने व दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.
आरोपींनी फिर्यादी यांचा १० हजारांचा मोबाईल फोन आणि १२०० रुपये रोख रक्कम असा एकूण ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला. हा प्रकार एमआयडीसी भोसरी येथे सोमवारी (दि. २२) रात्री सव्वाअकरा वाजता क क्षेत्रीय कार्यालयासमोर घडला.
प्रदीप कुमार सुरेश प्रसाद सिंग (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन राणुजी शिंदे (वय २२), विजय राजू तांगडे (वय १८, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.