- पोलिसांनी छापा मारून गांजासह आरोपीला केले जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- जामखेड येथून विक्री करण्यासाठी गांजा आणून तो आरोपीने त्याच्या घरासमोरील शेडमध्ये ठेवला. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळताच पोलिसांनी शेडवर छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांना एक लाख २६ हजार १५० रुपये किमतीचा पाच किलो ४६ ग्रॅम गांजा आढळून आला. ही घटना मंगळवारी (दि. २४) घडली. पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दुर्गेश भानुदास खाडे (वय ३०, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने बापू पवार (रा. जामखेड, परांडा) याच्याकडून गांजा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी गांजा जप्त केला आहे.