- दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत; दिघीत लॉजमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- प्रेयसीचा खून करून प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिघीमधील एका लॉजमध्ये घडली आहे. या दोघांचे मृतदेह नग्नावस्थेत आढळले आहेत. ३० वर्षीय आरोपी प्रकाश ठोसरने आधी प्रेयसीचा खून करून नंतर आत्महत्या केलीय.
गेल्या दोन वर्षांपासून मयत प्रकाश ठोसर आणि ३० वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. ते दोघे दिघी परिसरातील एका लॉजमध्ये नेहमी भेटायचे. हे दोघे अनेकदा रात्री मुक्कामी यायचे आणि सकाळी निघून जायचे असं पोलिसांनी सांगितले आहे. सकाळी चेक आऊट कऱण्याचा वेळ झाला तरी या दोघांनी रूमचा दरवाजा उघडला नसल्याचं तेथील कामगाराने दरवाजा ठोठावला. मात्र, बऱ्याच वेळानंतर देखील ते दरवाजा उघडत नसल्याने याची माहिती दिघी पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी लॉजवर येऊन दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला तेव्हा प्रकाशचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. तर खाली जमीनीवर ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.