न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- आपसात संगनमत करून आरोपींनी फिर्यादीला महावितरणचे वाशी, नवी मुंबई येथील काम उपठेकेदार म्हणून मिळवून देतो असे सांगितले. महावितरणला सिक्युरिटी डिपॉझिट देण्यासाठी फिर्यादीकडून १४ लाख ९२ हजार ९८८ रुपये आरोपींनी घेतले.
फिर्यादीकडून पैसे घेऊन आरोपींनी ते काम दुस-याच कंपनीला दिले. फिर्यादीने दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. मे २०१९ ते २५ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान ही घटना घडली.
राजेंद्र अशोक पाटील (वय ४२, रा. कराड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल देशपांडे (रा. कोथरूड, पुणे), हेमचंद्र कुरील (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.