- घटनेत आणखी टविस्ट..
- तपासादरम्यान दत्ता साने यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा उलगडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२१) :- वाढदिवसाचा केक सोबत न कापता निघुन गेल्याचा राग आल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब सदृश बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत. या प्रकारणात कोणतेही राजकारण नसुन सराईत गुन्हेगारांकडुन केवळ दहशत निर्माण करून पैसे उकळण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सांगवी पोलीसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक करून तपास पथकाला ७५ हजाराचे बक्षिस आणि प्रमाणपत्र जाहीर केले आहे.
तन्मय रामचंद्र मदने (वय १९ वर्ष, रा. साई श्रद्धा अपार्टमेंट, सुदर्शन नगर, लेन नं. ५, पिंपळे गुरव), २) विक्रम विजय जवळकर ( वय २० वर्ष, रा. फ्लॅट नं. २. हरिओम बिल्डींग, रेल्वे गेट समोर, कासारवाडी), ३) प्रदयुम्न किशोर भोसले (वय २३ वर्ष, रा. फ्लॅट नं. ३०३ साई मिलन बिल्डींग, सृष्टी हॉटेलच्या मागे, पिंपळे गुरव), सॅमसग अॅमेट आणि देवेंद्र बिडलान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन विधी संघर्षित बालकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवार (दि. २३) नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंपळ गुरव येथे घडली होती.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, आमदाराच्या भावाच्या पिंपळे गुरव येथील संपर्क कार्यालयावर तीन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येवुन हातामध्ये पेट्रोल असलेल्या बाटल्या फोडुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सुरवातीला हा हल्ला राजकिय द्वेषातुन झाला असावा, असा समज झाल्याने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन सांगवी पोलीस अधिकारी यांना आरोपींचा शोध घेवुन त्वरित अटक करण्याच्या सुचना देण्यात आल्या. दरम्यान, आरोपींनी तोंडाला मास्क लावला होता. तसेच दुचाकीचा नंबर प्लेट चिकटपट्टीने झाकलेला होता. पोलीसांन केवळ दुचाकी लिवेंडर रंगांची असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मुळ मालकाचा शोध लावला. दुचाकी मालकाकडे चौकशी केली असता आरोपी व्हॅगनर गाडी मधुन पळुन जात असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी आरोपींचा पाठलाग करीत ताम्हणी घाटात आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी अंतर्गत आरोपी कडुन धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपी तन्मय मदने याच्या वाढदिवसानिमित्त ‘ मास्टरमाईंड ‘ असे लिहिलेला केक कापण्यासाठी सोबत आमदार बंधु शंकर जगताप हे थांबले नाहीत. हा राग आरोपी तन्मय याला आला होता. शंकर जगताप यांच्या मनात दहशत निर्माण करून पैसे उकळण्यासाठी हा गुन्हा केला असल्याची कबुली आरोपींनी पोलीसांना दिली आहे.
कै. दत्ता (काका) साने यांच्या कार्यालयाची तोडफोड करुन दहशत निर्माण केली होती. मास्टर माईंड असलेले सराईत गुन्हेगार अशा कामात विधी संघर्षित बालकांचा वापर करतात. मध्यस्थी करण्याच्या नावाखाली विरोधकाकडुन हे गुन्हेगार लाखो रुपये उकळत होते. आरोपी देवेंद्र बिडलान याच्यावर ०६ गुन्हे तर आरोपी सॅमसन अॅमेट याच्या विरुद्ध २ गुन्हे दाखल आहेत. कै. दत्ता ( काका ) साने यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात सराईत गुन्हेगार देवेंद्र बिडला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात मध्यस्थी करण्याच्या नावाखाली त्याने तब्बल २० लाख रुपये उकळले असल्याचे विश्वसणीय वृत्त आहे. मात्र, पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत.