- सांगवीतील घटना; चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२१) :- काही वर्षांपूर्वी फिर्यादीची बहिणीमार्फत आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने फिर्यादीशी फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर ओळख वाढवली. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात अनेकदा फोनवरून संभाषण झाले. याशिवाय प्रत्यक्षात देखील अनेक वेळा भेट झाली.
आरोपीने फिर्यादी यांना सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी निवडण्याचं आमिष दाखवलं. फिर्यादीने होकार देत त्यांना तब्बल १ कोटी ६ लाख रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींवर भारत सरकारची मुद्रा चुकीच्या आणि बनावट पद्धतीने वापरल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे.
या घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत. डॉ. आदित्य दगडू पतकराव (वय-३६) यांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी विकास शिंदे, राजाराम शिर्के (कक्ष अधिकारी मंत्रालय, मुंबई), श्रेया चौहान, अजित दुबे अशा ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.