- अनोळखी महिले विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२१) :- चिंचवडगाव येथील पु. ना. गाडगीळ अँड सन्स या सराफी दुकानात एक अनोळखी महिला दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने आली. तिने हातचलाखी करून दुकानातील ट्रे मधील ११.८८० ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची शिव प्रतिज्ञा कोरलेली सोन्याची अंगठी चोरली.
त्या अंगठीच्या जागी पांढरे खडे असलेली व बारकोड लावलेली नकली अंगठी ठेऊन निघून गेली. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
मीनाक्षी अतुल दाभाडे (वय ४९, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २५ ते ३० वयोगटातील अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.