- पिंपरीतील गांधीनगरमधील घटना; आरोपीविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- गांधीनगर येथील एका हेअर कटिंग समोर आरोपी आरोपीने काहीही कारण नसताना अल्पवयीन मुलाच्या डाव्या गालावर धारदार शस्त्राने मारले. यात मुलगा जखमी झाला, त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.
हा प्रकार रविवारी (दि. २८) दुपारी दीडच्या दरम्यान घडला. सोहेल जावेद अन्सारी (वय ९) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याचे वडील जावेद रियाज अन्सारी (वय ३९, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाबासाहेब अशोक साळवे (वय २१, रा. गांधीनगर, पिंपरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.