- मालकाची पोलिसात धाव; भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातून एक टेम्पो चोरीला गेला आहे. दोन लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो फिर्यादीच्या राहत्या घराच्या सोसायटीसमोर रस्त्यावर पार्क केला होता.
अज्ञात चोरट्याने ते वाहन चोरून नेले. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. २७) रात्री पावणेबारा ते रविवारी (दि. २८) सकाळी सात या कालावधीत घडला. श्रीराम मारुती भोसले (वय ५५, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.