- पालिकेचा तो दावा खोटा; आता ०६ डिसेंबरची मुदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकीचा तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आहे. प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या (दि. ३०) संपुष्टात येत आहे. मात्र, पालिकेकडून अद्याप आराखडा तयार नसल्याने पालिकेने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती, हे स्पष्ट झाले आहे.
या मागणीचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला प्रारूप आराखडा सादर करण्यास ६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा ५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून तो ०६ डिसेंबर २०२१ रोजी आयोगाच्या कार्यालयास सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयागाचे उपआयुक्त अविनाश सणस यांनी काढला आहे.
पालिका प्रशासनाकडून आराखडा तयार झाल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांची सही झाल्या नंतर तो आराखडा सोमवारी (दि. ०६) रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यासाठी तिसऱ्यांदा बदल केल्यामुळे आयोगाने दिलेला कालखंड अपुरा पडत असल्याचे चित्र आहे.