न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवार (दि. १) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यातच गारठा देखील जाणवू लागला आहे.
दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पिंपरी चिंचवड शहरासह राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मंगळवारी वर्तविली आहे.