- अग्निशामक विभागाचे शर्थीचे प्रयत्न; पिंपळे सौदागरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- पिंपळे सौदागर येथे घरातील महिला हॉलमध्ये गप्पा मारत होत्या. यावेळी अवघ्या दीड वर्षांची चिमुकली बेडरूमध्ये नकळत गेली आणि आतून कडी लावली.
दरम्यान, तिचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील महिला धावत बेडरुमकडे आल्या. त्यांनी चिमुकलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आलं नाही. ती अर्धा ते एक तास बेडरूमध्ये ती अडकली होती
घटनेची माहिती पिंपरी अग्निशमन विभागाला देण्यात आली. यानंतर त्यांचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं. खिडकी अरुंद असल्याने अखेर दरवाजा तोडून चिमुकलीला बाहेर काढायचं अस ठरवलं. अखेर त्यांनी या मुलीला सुखरूप बाहेर काढून कुटुंबीयांना धीर दिला, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या जवानांनी दिली. आज (१ डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.