- नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२१) :- नवीन मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम-२०२२ अंतर्गत भारत निवडणूक आयोगानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. या संधीचा लाभ घेऊन शहरातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
५ डिसेंबर पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार फॉर्म क्रमांक ६ भरून नवीन नावे पुन्हा दाखल करू शकतात. फॉर्म नंबर ७ भरून यातील मयत, स्थानांतरित यांची नावे मतदार यादीतून वगळून शकतात. तसेच फॉर्म नंबर ८ भरून मतदार यादीतील लिंग, नाव, वय याबाबतच्या चुका दुरुस्त देखील होऊ शकतात.
तसेच फॉर्म क्रमांक आठ अ भरून त्याच मतदारसंघातील एका भागातून दुसऱ्या भागामध्ये नावे स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. तसेच एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर मतदार ऑनलाईन देखील हे सर्व प्रकारचे फॉर्म भरू शकतात. भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून त्यावरूनही सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात. तरी सर्व मतदार व नागरिकांनी व सर्व इच्छुक उमेदवारांनी सदर यादी तपासून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.