- एकाला लुटले, इतरांच्या सात वाहनांच्या फोडल्या काचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२१) :- कारमधून घरी जात असताना दापोडीतील किनारा हॉटेलसमोर शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांची कार अडवली. त्यांना कारमधून बाहेर काढले. त्यांच्या कारची काच फोडून नुकसान केले. त्यांनतर कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून १५०० रुपये रोख रक्कम, आधार कार्ड तसेच कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतले.
तिथून निघून जात असताना आरोपींनी इतरांच्या दोन रिक्षा, पाच टेम्पो अशा सात वाहनांच्या काचा फोडून सुमारे ३० हजारांचे नुकसान केले. यामुळे सामान्य लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आलीम अब्दुलागफूर मलिक (वय २६, रा. गुरव पट्टा, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर वाल्मिकी, प्रणव उर्फ सोन्या कांबळे, ऋतिक जावीर, संकेत उर्फ महादया पवार, चिक्क्या उर्फ राहुल साळवे, इम्या, अक्षय उर्फ जंगल्या भालेराव (सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.