- पालिका शाळांचा पाचवीचा ५.१ तर, आठवीचा निकाल ६.६ टक्के जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला आहे.
यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका शाळांचा इयत्ता पाचवीचा निकाल ५.१ टक्का, तर आठवीचा निकाल ६.६ टक्के इतका लागला, अंतिम निकाल येत्या पंधरा ते वीस दिवसांत लागेल, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी स्मिता गौड यांनी दिली.
गुण पडताळणीसाठी डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली होती. गुणपडताळणी अर्ज निकाली काढून अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन गुणपडताळणी अर्ज दाखल झाल्यापासून ३० दिवसांत निकाली काढून अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.