- वेताळनगर शिवसेना शाखेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२१) :- शहरातील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर आणि चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकार यांच्या पुढाकाराने वेतळनगर शाखेत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. आज रविवारी घेतलेल्या या सदस्य नोंदणी अभियानाला नव शिवसैनिकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बांधणी करण्यात येत आहे. पक्षश्रेश्रेष्ठींच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसैनिक कामाला लागले आहेत. वेताळनगर शाखा अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले, शहर संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विभाग प्रमुख सचिन चिंचवडे, श्रीमंत गिरी, राजेश आडसूळ, संदीप भालके, माऊली जगताप, महेश कलाल, दिलीप भोंडवे, किशोर सातपुते, मुस्ताक शेख, रमेश शेंडगे, राजू मासाळकर, खयुम पठाण, नितीन काशीद, विनोद वायदंडे, अनिल शिंदे, सागर बोराडे, उमेश सकट, सुनील बोराडे, धनंजय सूर्यवंशी, महेश सिंधी आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत पक्षाचे मताधिक्य जास्तीत जास्त कसे वाढेल यावर भर देण्यात येणार आहे. सदस्य नोंदणीचा उचांक गाठण्यासाठी शाखा स्तरावर नोंदणी सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सौंदणकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर, विभागप्रमुख सचिन चिंचवडे, शाखाप्रमुख माजित शेख, उपविभाग प्रमुख कुदरत खान, किशोर सातपुते यांनी