- लाचलुचपत विभागाकडून पैसे घेताना पकडले होते रंगेहाथ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या थेरगाव विभागीय कार्यालयातील दोन लाचखोर लिपिकांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
प्रदीप कोठावदे व हैबती मोरे असे त्या लाचखोर लिपिकांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पैसे घेताना सापळा रचून अटक
केली. त्यांच्यावर १८ डिसेंबला वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा लिपिकांनी लोकसेवक म्हणून पदाचा गैरवापर करून अशोभनीय गैरवर्तन केले आहे. त्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे त्यांचे अटकेच्या दिवसापासून सेवानिलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.