- तब्बल १६ लाखांच्या रोकडसह आरोपींचा पोबारा; पोलीस आरोपींच्या मागावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- खेड तालुक्यातील चिंबळी गावात अज्ञात ३ ते ४ व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. आरोपींनी तब्बल १६ लाख घेऊन पोबारा केला.
एटीएम फोडल्याची घटना पहाटेच्या वेळी घडली. अज्ञात आरोपींनी एटीएम परिसरातील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली आहे. घटनेनंतर बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, तेथील एका व्यक्तीने आरोपींना पाहिलं असून तो आरोपींना घाबरून घरात लपला. अज्ञात ३-४ व्यक्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.