न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२१) :- प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज (सी.बी.एस.ई) दरवर्षी नववर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आज ३१ डिसेंबर निमित्त प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी च्या विदयार्थ्यांसाठी नववर्षाभिनंदनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
कॉलेजच्या सेवा या शैक्षणिक कृती कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इतर वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून पोस्टर बनविणे व पाक कलेची शिकवण देण्यात आली. विद्यालयाच्या शिक्षिका अनिशा अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना पाककला शिकविल्या. केक बनविणे व बिस्कीटे बनविण्याच्या कलाकृतींबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याबरोबर समाजातील आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी चौका-चौकात गरजू लोकांना व संत मुनीबाबा वृद्धाश्रमात जाऊन केक व बिस्कीटे वाटप केले व त्यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी मानवतेची भावना दाखविली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यातूनच भारताची उद्याची उज्ज्वल पिढी घडविण्यास मदत होईल, असे मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी सांगितले.