- शहर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२१) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड शाखा व निगडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित ‘ चला व्यसनाला बदनाम करूया ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वाईन विक्री धोरणाचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे मत राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केले.
गेली दहा वर्षे हा उपक्रम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी ३१ डिसेंबर पिंपरी चिंचवड परीसरात संपन्न होत असतो. या वर्षी भक्तीशक्ती उद्यानासमोर संस्थेच्या वतीने नागरिकांना मोफत दूधाचे वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली गेली. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले गेले. महिलांनी दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. यामुळे अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अत्यंत स्त्युत्य असा हा उपक्रम असून सर्व स्तरांपर्यंत असे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
या उपक्रमासाठी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे,पिंपरी चिंचवड शाखेचे विजय सूर्वे,शुभांगी घनवट,अंजली इंगळे,विश्वास पेंडसे,चारूदत्त बुध्दिसागर,राजू जाधव, रविंद्र बोर्लिकर,अशोक जाधव, यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले निगडी शाखेचे अध्यक्ष प्रदिप तासगावकर यांनी दूधासाठी सहकार्य केले.निगडी प्राधिकरण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश सोम्मय्या यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्धाटन झाले. तसेच वाचकांना वार्षिक अंक देऊन पुढील वर्षाची वार्तापत्र सभासद नोंदणी केली सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व दुधाचा आस्वाद घेतला.