न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- वाल्हेकरवाडी परिसरात एका निर्जन ठिकाणी एकजण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयताची ओळख पटवली. अभी व्यंकट पवार (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत हा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. पार्टी करीत असताना मित्रांशी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मंगळवारी (दि. ४) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.