- शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील मोहननगर व पिंपरीतील उद्यमनगर परिसरात (HDH) बेघरांसाठी घरे या योजनेतून घरांचे प्रकल्प पुर्णत्वास येत आहेत. याठिकाणी जेवढे लाभधारक आहेत, त्यापेक्षा जास्त घरे निर्माण होत आहेत.
P.M.A.Y. योजनेतून देखील शहरात असंख्य लाभधारकांनी घरासाठी अर्ज केलेले आहेत. अनेक लाभधारक प्रतिक्षेत आहेत. या HDH योजनेतील उर्वरित घरे P.M.A.Y. योजनेमधील प्रतिक्षेत लाभधारकांना देण्यात यावीत. त्यामुळे गरीब व गरजु कुटुंबीयांना मोठा आधार मिळेल, अशी मागणी शहर सुधारणा समितीच्या सभापती अनुराधा गोरखे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.