- किमती मशीन चोरून केला पोबारा; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- एमआयडीसी भोसरी येथे श्री इंटरप्रायजेस नावाच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने बुधवारी सकाळी पावणे सात वाजता फिर्यादी यांच्या दुकानातून चोरी केली.
प्लास्टिक वेल्डिंग मशीन, प्लॅनर मशीन, जेक्सो मशीन, प्लास्टिक वेल्डिंग गन, १६०० वॅट पॉवरची प्लास्टिक वेल्डिंग मशीन असा एकूण ४९ हजार ६०० रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या.
पारस शर्मा (वय ४०, रा. चोटीया, प्यासी, सलेमपूर, जि. देवोरीय, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. श्रीमंत ज्ञानदेव बोबडे (वय ३६, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.