- चौघांकडून एकाला मारहाण; एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- ‘हमारे नेपाली औरत के साथ क्यू बात करता है’ असे म्हणून हाताने मारहाण केली. त्यांनतर एकाने फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता एमआयडीसी भोसरी येथील यशवंत चौकातील टपरीजवळ ही घटना घडली.
अमर गौतम कसबे (वय २२, रा. पांडवनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि. ५) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजू थापा (वय ३०, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन नेपाळी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.