- पोलिसांकडून मध्यस्थी; पत्नीचा तक्रार दाखल करण्यास नकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यात घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा भररस्त्यात गळा दाबून रस्त्यावर आपटल्याचा धक्कादायक प्रकार निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करुन दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पत्नीने पती विरोधात तक्रार करण्यास नकार दिल्याने त्यांचे समुपदेशन करुन सोडून दिले.
सीसीटीव्हीमध्ये महिला पायी रस्त्याने चालताना दिसत आहे. तर पती त्याच्या लाल रंगाच्या स्कुटीसोबत पुढे येऊन थांबलेला दिसत आहे. आपल्या पत्नीला मागून येताना गाडीवरुन उतरुन तिच्या मागे पळू लागतो. यावेळी तो पत्नीचा गळा दाबतो आणि तिला जोरदार खाली आपटतो. यावेळी तो पत्नीला रस्त्यावर लोळवतो. महत्त्वाचे म्हणजे ज्याठिकाणी हा प्रकार घडला आहे तो रस्ता वर्दळीचा असल्याचे दिसत आहे. रस्त्याने गाड्यांची ये-जा सुरु आहे. भरदिवसा हा प्रकार घडला आहे.