- शहरात आज ८१७ कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू; २२ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जून २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ६) रोजी ८१७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २८१३२९ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७५३७१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.
दरम्यान आज ओमायक्राँनचा ०१ नवीन रुग्ण आढळलेला आहे. हा रुग्ण पुरुष असुन युएसए येथुन आलेला आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असुन रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. एकूण ७९ कोविड- १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ६२ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.