न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- महापालिकेच्या ‘ क ‘ प्रभाग अतिक्रमण पथकाने आज शनिवारी (दि ८) रोजी १९ टपऱ्या व १३ ठिकाणच्या फुटपाथवरील अनधिकृत फ्लेक्स व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट निरीक्षक प्रसाद आल्हाट, राजश्री सातलेकर यांच्या पथकाने ही कारवाई आज केली.
प्रभाग क्रमांक २ व ८ मध्ये सरकारचौक ते बो-हाडेवाडी ते पुणे नाशिक रोडलगतच्या फुटपाथवरील सर्व टपऱ्यावर अतिक्रमणाची कारवाई करून टपऱ्या जप्त करण्यात आल्या.
तसेच ‘ क ‘ प्रभाग अंतर्गत अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, राजश्री सातळीकर, अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आले.