- जीवे मारण्याची धमकी; तडीपार गुंड अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला २१ सप्टेंबर २०२० रोजी दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तो शासनाची किंवा पोलीस उपायुक्तांची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला.
याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलीस हवालदार त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी तो भाजी मंडईजवळ उभा होता. त्याने पोलीस हवालदार यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
पिंपरी भाजी मंडई येथे शनिवारी (दि. ८) दुपारी हा प्रकार घडला. पोलीस हवालदार संपत मच्छिंद्र खाडे यांनी शनिवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन शिवाजी सुर्वे (वय ३७, रा. भीमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.